छावणी परिषदेचे काम ‘व्हॅलीड बोर्डा’कडे
By Admin | Updated: June 9, 2014 00:43 IST2014-06-09T00:17:43+5:302014-06-09T00:43:06+5:30
नाशिक : शुक्रवारपासून एक वर्षासाठी छावणी परिषदेचे कामकाज ‘व्हॅलीड बोर्ड’ पाहणार आहे. छावणी परिषदेची सभा पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडीयर राजीव शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

छावणी परिषदेचे काम ‘व्हॅलीड बोर्डा’कडे
नाशिक : छावणी परिषदेची मुदत संपल्याने शुक्रवारपासून एक वर्षासाठी छावणी परिषदेचे कामकाज ‘व्हॅलीड बोर्ड’ पाहणार आहे.
छावणी परिषदेची सभा पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडीयर राजीव शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विकासकामांना मंजुरी देण्यात आली. दिल्लीतील संरक्षण विभागाच्या डीजी कार्यालयाकडून आलेल्या पत्राची माहिती देण्यात आली. त्या पत्रानुसार वर्षभरासाठी व्हॅलीड बोर्ड कारभार पाहणार आहे. व्हॅलीड बोर्डात कॅन्टोन्मेंट कायद्यातील तरतुदीनुसार बोर्ड अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे कायम राहणार असून, नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून संरक्षण विभागाकडून एका स्थानिक व्यक्तीचे नामांकन येऊ शकते.
बैठकीला उपाध्यक्षा सुरेखा गोडसे, नगरसेवक बाबूराव मोजाड, दिनकर आढाव, दिनकर पाळदे, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, कावेरी कासार, सुनंदा कदम, लष्करनियुक्त सदस्य ब्रिगेडीयर एस. आर. घोष, कर्नल जे. एस. ब्रार, मेजर अमित शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पेंद्र सिंह उपस्थित होते. (वार्ताहर)