शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे काम युद्धपातळीवर

By admin | Updated: January 30, 2016 22:51 IST

विंचूर-लासलगाव रस्ता : वाहतुकीचा प्रश्न लागणार मार्गी

विंचूर : विंचूर-लासलगामार्गावरील सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम प्रगतिपथावर असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. वर्षभरापासून कठडे नसणाऱ्या या धोकादायक पुलाच्या दुरुस्तीसह नवीन पुलामुळे विंचूर-लासलगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.विंचूरसह पंचक्र ोशीतील गावे व लासलगाव या गावांमधील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या येथील स्मशन-भूमीजवळील ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटल्याने रहदारीच्या व नागरिकांच्या दृष्टीने पूल धोकादायक परिस्थितीत आहे. वर्षभरापासून कठडे नसलेल्या अरूंद पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. पुलावर दिवसभर वर्दळ असते. पुलाचे कठडे तुटलेले असल्याने दोन्ही बाजूने वाहने आल्यास वाहनधारकांना पूल पार करण्यासाठी कसरत करावी लागत होती. यामुळे वाहनधारकात नाराजीचा सूर होता. विंचूरसह पंचक्रोशीतील गावांसाठी प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. परिसरातील शेतकरी लासलगाव बाजार समितीच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्याने करीत असल्याने नेहमी वर्दळ असणाऱ्या या पुलाची दुरूस्ती करण्याबरोबरच रुंदी वाढविण्याची जुनी मागणी होती. अरूंद पुलावरून प्रवास करताना वाहनांचा अपघात होऊन जखमी होण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले होते. पुलाची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.याबाबत प्रथम ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामास प्रारंभ करण्यात आला. दिवाळीदरम्यान दहा-बारा दिवस काम बंद होते. त्यानंतर मात्र युद्धपातळीवर पुलाचे व रस्त्याचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू झाले. प्रथम जेसीबी, पोकलॅण्ड मशीनच्या साह्याने पुलानजीक असलेला गाळ व माती हटविण्याचे काम करण्यात आले. पुलाखाली पाणी असल्याने आठ ते दहा दिवसांपर्यंत गाळ काढणे व फाउंडेशनचे काम सुरू होते.(वार्ताहर)