मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

By Admin | Updated: November 8, 2016 01:19 IST2016-11-08T01:22:47+5:302016-11-08T01:19:13+5:30

मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

Word of the Year | मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

मनपाच्या वर्धापनदिनी शब्द-सुरांची मैफल

नाशिक : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आर. एम. गु्रप यांचा लोकगीत-नृत्याचा कार्यक्रम तसेच हीट मेलडिजची शब्द-सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात आर. एम. ग्रुपच्या वतीने विविध लोकगीते व लोकनृत्य सादर करण्यात आले. त्यात वासुदेव नृत्य, खंडोबाचा गोंधळ, देवीचा जोगवा यांचा समावेश होता. याशिवाय, सध्या गाजत असलेल्या चित्रपट गीतांनाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राहुल शृंगार, दीपक लोखंडे, कांचन गोसावी, श्रीकांत गायकवाड यांनी गीते सादर केली. त्यांना संगीत साथ सुनील साळवे (गिटार), पुष्कर साळवे व सावन बोर्डे (ढोलकी), फारूक पिरजादे (हॅँडसोनिक) यांनी केली. निवेदन अमर भोळे यांनी केले. त्यानंतर हिट मेलडीजची सिनेसंगीताची मैफल रंगली. अल्ताफ अन्सारी, अनिस शेख, सोनल पडाया यांनी गीते सादर केली. त्यांना साथसंगत संजय कसोटे, अजय गांगुर्डे, दिनेश कनोजिया, बाळू उन्हवणे, रऊफ अन्सारी यांनी केली. (प्रतिनिधी)





 

Web Title: Word of the Year