शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

इलेक्ट्रिक बसच्या २७ कोटींसाठी केंद्राकडे लकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:33 IST

महापालिकेच्या शहर बस वाहतुकीला मुहूर्त लागलेला नाही. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भरपाईसाठी केंद्र शासनाकडे मागणी करतानाच इलेक्ट्रिक बससाठी २७ कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही बससेवा सुरू झाल्यास किमान १२ रुपये ६० पैसे कमी खर्च लागणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे पत्र : तोटा कमी करण्यासाठी उपाययेाजना

नाशिक : महापालिकेच्या शहर बस वाहतुकीला मुहूर्त लागलेला नाही. तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. भरपाईसाठी केंद्र शासनाकडे मागणी करतानाच इलेक्ट्रिक बससाठी २७ कोटी रुपयांचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ही बससेवा सुरू झाल्यास किमान १२ रुपये ६० पैसे कमी खर्च लागणार आहे.महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी २०१८ मध्ये निर्णय घेतला. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डिझेल आणि सीएनजी बस ठेकेदारामार्फत चालवण्यावर भर देण्याचे ठरवले होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिकल आणि सीएनजी बसवर भर देण्यास सांगितल्याने डिझेल बसची संख्या कमी करण्यात आली. सध्या २०० सीएनजी बस, ५० मिडी डिझेल बस आणि दीडशे इलेक्ट्रिक बसद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचे नियेाजन केले. बसचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याचे ठरवल्यास त्यासाठी केंद्र प्रोत्साहन म्हणून अनुदान देते. सध्या एका बससाठी ५५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार असले तरी केवळ पन्नाससाठीच मर्यादा आहे. उर्वरित १०० बससाठी अनुदान मिळावी यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे घटलेले उत्पन्न त्यातच बससेवा तोट्यातील सेवा असल्याची खात्री यामुळे प्रशासनाने हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. केंद्र शासनाच्या अंंदाजपत्रकात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३०० कोटी रुपये मिळावे यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेने फेब्रुवारीअखेरीस बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. ही १२ रुपये ६० पैेसे प्रति किलोमीटर इतकी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच प्रशासन इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसा