महिलांसाठी ‘स्वयम्’ उपक्रम
By Admin | Updated: November 30, 2015 23:15 IST2015-11-30T23:13:51+5:302015-11-30T23:15:30+5:30
सिएटचा पुढाकार : झोपडपट्टीतील महिलांना प्रशिक्षण

महिलांसाठी ‘स्वयम्’ उपक्रम
सातपूर : प्रबुद्धनगर झोपडपट्टीतील बेरोजगार महिलांना वाहनचालक, कराटे याबरोबरच इंग्रजी बोलता यावे यासाठी प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सिएट कंपनीने पुढाकार घेतला असून, त्यासाठी कंपनीने स्वयम् नावाने उपक्र म सुरू केला आहे.
बेरोजगार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा व गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी सातपूर येथील सिएट कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत आरपीजी ग्रुप च्या वतीने महिलांसाठीच्या स्वयम् उपक्रमांतर्गत प्रबुद्धनगरातील महिलांसाठी आयोजित प्रक्षिक्षण शिबिराचा शुभारंभ माजी नगरसेवक ज्योती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे सीएसआर विभागाचे किरण माने (मुंबई), जयराज बागुल, प्रफुल्ल भुते (मुंबई) आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आरपीजी ग्रुपची भूमिका व मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण शिबिरात महिलांसाठी वाहनचालक, इंग्लिश स्पिकिंग, कराटे आदि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा उपक्रम आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष अनंत गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र राबविला जात आहे. प्रास्ताविक बजरंग शिंदे यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.