मंदिरातील महिला पोलिसास मारहाण

By Admin | Updated: September 7, 2015 00:27 IST2015-09-07T00:27:23+5:302015-09-07T00:27:47+5:30

मंदिरातील महिला पोलिसास मारहाण

Women's policeman assault in the temple | मंदिरातील महिला पोलिसास मारहाण

मंदिरातील महिला पोलिसास मारहाण

नाशिक : लहान मुलांच्या वादातून एका मुलास मारहाण करणाऱ्या महिलेस समजावण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर येथून सिंहस्थ बंदोबस्तासाठी आलेली एक महिला पोलीस कर्मचारी पंचवटीतील काळाराम मंदिरासमोर ड्युटीवर आहे़ शनिवारी (दि.५) दुपारी ३ वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या वादातून ज्योती दत्तात्रय पाटील या लहान मुलास मारहाण करीत होत्या. त्यांना या मारहाणीचे कारण विचारले असता त्याचा राग येऊन त्यांनी महिला पोलिसाचा गणवेश पकडून मारहाण केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's policeman assault in the temple