स्त्रियांचा सहभाग आवश्यक

By Admin | Updated: September 12, 2016 01:39 IST2016-09-12T01:39:12+5:302016-09-12T01:39:35+5:30

क्रांती मोर्चा नियोजन : बैठकीत सर्वपक्षीय महिला नेत्यांची उपस्थिती

Women's participation is important | स्त्रियांचा सहभाग आवश्यक

स्त्रियांचा सहभाग आवश्यक

 नाशिक : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातून २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचा सूर उमटला. गंगापूररोड परिसरातील सीएमसीएस महाविद्यालयाच्या सभागृहात मराठा समाजातील स्त्रियांची मोर्चाच्या नियोजनाविषीयी बैठक पार पडली. यावेळी समाजातील सर्वपक्षीय महिला नेत्यांनी स्त्री सुरक्षेसाठी स्त्रियांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, गौरी आडके , माधुरी भदाने, सुलोचना हिरे, माधवी पाटील, रश्मी हिरे आदि विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाच्या विविध समस्यांविषयी माहिती दिली. एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाजातील अनेक कु टुंबांना आता दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठीही संघर्ष करावा लागत आहे. कोपर्डीसारख्या घटनांमुळे मुलीही सुरक्षित नसल्याचे समोर आले असताना अशा अत्याचाराच्या घटनांसह इतर प्रकरणामध्येही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होतो. त्यामुळे समाजात मुलींवर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात व समाजाला अ‍ॅट्रॉसिटीच्या भीतीच्या सावटातून मुक्त करण्यासाठी महिलांनी उभे राहण्याची वेळ आली असून, महिला सक्षमीकरणासाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्यासाठी समाजातील महिलांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे मत बैठकीसाठी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. हा मूक मोर्चा असल्याने गप्पा मारणे, सेल्फी काढणे, घोषणाबाजी टाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
दरम्यान, समाजातील महिलांच्या बैठकीला सुरुवातच असल्याने प्रतिसाद कमी प्रमाणात असला तरी पुढील बैठकांसाठी अधिकाधिक समाज भगिणींपर्यंत पोहोचण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Women's participation is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.