दारू दुकानबंदीसाठी महिलांचे आंदोलन
By Admin | Updated: April 10, 2017 01:47 IST2017-04-10T01:47:15+5:302017-04-10T01:47:24+5:30
सातपूर : अशोकनगर येथील मद्यविक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन पुकारले.

दारू दुकानबंदीसाठी महिलांचे आंदोलन
सातपूर : अशोकनगर येथील मद्यविक्रीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन पुकारले. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन बंदोबस्त तैनात केला.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील सर्व मद्य दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद झाली असताना अशोकनगर येथील दुकानदेखील बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी कालपासून आंदोलन पुकारले आहे. आज पुकारलेल्या आंदोलनाप्रसंगी नगरसेवक सुदाम नागरे उपस्थित होते. सदरचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, अशी आग्रही मागणी महिलांनी केली आहे.
मद्यपींमुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने महिलांनी तीव्र आंदोलन छेडत दुकानाचे शटर बंद केले. यावेळी विक्र म नागरे, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील आदिंनी पुढाकार घेत महिलांना पाठिंबा दिला. याबाबत गुरुवारी बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, अशोक पवार यांनी धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली. (वार्ताहर)