महिलांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: April 6, 2016 23:13 IST2016-04-06T22:33:52+5:302016-04-06T23:13:37+5:30
महिलांचे आरोग्य धोक्यात

महिलांचे आरोग्य धोक्यात
रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला आवर्जून खरेदी केली जाते. हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. मात्र, सध्या मासेमारीवर असलेली बंदी, सराफांचा बंद, आर्थिक संकटात सापडलेला आंबा व्यवसाय यामुळे बाजारपेठेतील उलाढाल थांबली आहे. त्याचा परिणाम पाडव्याच्या खरेदीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावर्षी पाडवा शुक्रवारी असल्याने, शिवाय दुसरा शनिवार व रविवार मिळून नोकरदार मंडळींना कार्यालयीन कामकाजात सलग तीन दिवस जोडून सुटी आली आहे. पाडव्याला सोने, चांदीचे अलंकार खरेदी केले जातात. मात्र, सराफी व्यवसाय बंद असल्याने नवीन खरेदी महिनाभर थांबली आहे.
पाडव्याला वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, तयार घरे, जमिनींची खरेदी केली जाते, किंबहुना आधी खरेदी केलेल्या वस्तू पाडव्याच्या दिवशी घरी आणल्या जातात. परंतु मासेमारी व त्यावर अवलंबून असलेले अन्य व्यवसाय बंद आहेत. शिवाय आंब्याच्या उत्पादनात घट शिवाय दरातील कमालीची घसरण यामुळे स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण ठरवणारे महत्त्वाचे व्यवसाय बंद झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर होणार आहे.
फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भेटवस्तूची सुविधा विक्रेत्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, गृहसंकूल प्रकल्प व्यावसायिकांनीही आकर्षक भेट योजना जाहीर केल्या आहेत. सेकंड होमसाठी गुंतवणूक मात्र कर्मचारीवर्गातून सुरू असली तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय लोकेशन व दर्जा पाहून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
बाजारात कडूनिंबाचा पाला, झेंडूची फुले, बत्ताशांच्या माळा, वस्त्र, बांबू विक्रीसाठी आले आहेत. शिवाय तयार गुढ्यादेखील विक्रीस उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)
दर्जाकडे लक्ष : कर्मचाऱ्यांची गुंतवणूक
स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक मंदी, शिवाय जागतिक मंदीची झळ कमी - अधिक प्रमाणात सर्वांनाच बसत आहे. दरवेळच्या विक्रीप्रमाणे यावर्षी विक्री नसली तरी कामाचा दर्जा व सुविधा याकडे ग्राहकांचा कटाक्ष आहे. त्यामुळे सध्या आमच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे. बुकिंग सुरू आहे. पझेशन सोहळा एकाच दिवशी आयोजित केला जातो.
राजेश शेट्ये,
बिल्डर, रत्नागिरी.
मासेमारी पूर्णत: बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसायही बंद आहेत. स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आंबा व्यवसाय गेली काही वर्षे संकटात आला आहे. रिअल इस्टेट गुुंतवणुकीस त्याची झळ बसत आहे. लोकेशन पाहून खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय कर्मचारीवर्ग आवश्यकतेनुसार बुकिंग करीत आहे.
- प्रकाश साळवी, बिल्डर, रत्नागिरी