नामपूरला महिला सक्षमीकरण मेळावा
By Admin | Updated: August 14, 2016 22:46 IST2016-08-14T22:32:42+5:302016-08-14T22:46:34+5:30
नामपूरला महिला सक्षमीकरण मेळावा

नामपूरला महिला सक्षमीकरण मेळावा
नामपूर : ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक स्तर उंचविण्यासाठी महिला समूह गटाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. महिला समूह गटांना व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण देऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी भाजपा सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी केले.
जिल्हा विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती बागलाण यांच्या वतीने येथील आर. के. मंगल कार्यालयात आयोजित महिला सक्षामीकरण मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परीषद सदस्य सुनीता पाटील यांनी प्रस्ताविक केले. यावेळी त्या म्हणाल्या की, गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात नामपूर जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली. महिला समूह गटाचे जाळे भक्कम करून ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी करण्याचा निर्धार पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्र मास भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आण्णासाहेब सावंत, संजय भामरे, पंचायत जिजाबाई सोनवणे, मंगलाबाई सावंत, महेंद्र कोर, एस. टी. माळी, क्षत्रिय पूनम कोकणे आदि उपस्थित होते. भाऊसाहेब कापडणीस, अविनाश सावंत, रमेश देवरे, संजय भामरे, भाऊसाहेब अहिरे, अशोक जगताप, समीर सावंत, महिलांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रदीप पेशकर यांनी बचतगटांना केलेआहे. (वार्ताहर)