कोकणखेडेत महिला सक्षमीकरण मेळावा

By Admin | Updated: December 6, 2015 22:17 IST2015-12-06T22:16:28+5:302015-12-06T22:17:43+5:30

कोकणखेडेत महिला सक्षमीकरण मेळावा

Women's Empowerment Meet in Kokankhede | कोकणखेडेत महिला सक्षमीकरण मेळावा

कोकणखेडेत महिला सक्षमीकरण मेळावा

चांदवड : कोकणखेडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, उसवाड व पंचायत समिती, ग्रामपंचायत कोकणखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा घेण्यात आला.
आरोग्य विभागाच्या वतीने किशोरवयीन मुली, महिला यांचे वजन, उंची, एच.बी. व बीएमआय करण्यात आले. यावेळी डॉ. प्रदीप जायभावे यांनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी कोकणखेडेचे सरपंच नारायण शिंदे, ग्रामसेवक श्रीमती व्ही. व्ही. घिसाडी, आर. एम. बागुल, जी. जी. बिडगर, विठ्ठल शिंदे, नामदेव शिंदे, रोहिणी कुलकर्णी, श्रीमती ए. टी. बागल, श्रीमती आष्टेकर, सानप, नवले, केरू पवार यांच्यासह सर्व आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. (वार्ताहर )

Web Title: Women's Empowerment Meet in Kokankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.