उपनगराच्या नावाचा फलक लावून महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:19 IST2020-03-09T14:19:14+5:302020-03-09T14:19:42+5:30
देवळा : देवळा शहरातील ओम नगर या उपनगरातील महिलांनी स्वखर्चाने आपल्या उपनगराच्या नावाचा फलक लावून महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला .

- ओमनगर येथे फलकाचे अनावरण प्रसंगी केदा आहेर , अरूणा खैरनार, माधुरी मेतकर, पुनम आहेर, वंदना मेतकर,ललिता आहेर,राजूबाई सावकार, आबासाहेब खैरणार, भाऊसाहेब पगार, शांताराम निकम, राजेंद्र मेतकर, विजय मेतकर, केदारनाथ मेतकर, आदी.
ठळक मुद्देशहरातील सर्वात जुने असलेल्या ओम नगर ुया उपनगरात नावाचा फलक नसल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना या भागाची सर्वांना ओळख व्हावी या उद्देशाने येथीलअरु णा खैरनार, माधुरी मेतकर व व इतर महिलांनी एकत्र येत महिला दिनानिमित्त फलक लावण्याचा निर्णय घेतला .
या उपनगरात वर्षभरात गणपती, नवरात्र उत्सव, हरतालिका, ऋ षिपंचमी, हळदीकुंकू सारखे सण महिला उत्साहाने साजरा करतात .महिला दिनानिमित्त लावण्यात आलेल्या फलकाचे अनावरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व या प्रभागातील नगरसेवक लक्ष्मीकांत आहेर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी ओम नगर मधील रिहवासी उपस्थित होते .