चिराई येथे पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

By Admin | Updated: March 28, 2017 02:15 IST2017-03-28T02:14:22+5:302017-03-28T02:15:14+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व व काटवन भागात यंदा अपुऱ्या पावसामुळे जानेवारी अखेरीसच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.

Women's Cemetery Front for Water at Chirai | चिराई येथे पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

चिराई येथे पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व व काटवन भागात यंदा अपुऱ्या पावसामुळे जानेवारी अखेरीसच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या भागातील चिराई गावाचीही अशीच परिस्थिती असताना प्रभारी तहसीलदारांनी परिसरात मुबलक पाणी असल्याचा अहवाल सादर करून टॅँकर देण्यास टाळाटाळ केल्याने रणरागिणींमध्ये चांगलाच उद्रेक होऊन आज सोमवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. मात्र महसूल विभागाने तोडगा न काढल्याने संतप्त झालेल्या महिलांनी उपसरपंचासह सर्कल, कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात चार तास डांबून ठेवले.  वेळोवेळी टॅँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करूनही प्रभारी तहसीलदारांनी चिराई भागात मुबलक पाणी असल्याचा शेरा मारून टॅँकर पुरविण्यास असमर्थता दाखविल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उद्रेक झाला. संतप्त महिला व पुरु षांनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास चिराई ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून महसूल यंत्रणेचा निषेध केला. यावेळी मोर्चेकरी डॉ. शेषराव पाटील यांच्यासह महिलांनी उपसरपंच पोपट अहिरे, सर्कल सी.पी. अहिरे, व्यंकट अहिरे, योगेश अहिरे, अहिरे यांच्याशी चर्चा केली; परंतु टॅँकर पुरविण्याचे अधिकार आम्हाला नसल्याचे सांगून एक प्रकारे त्यांनी हात वर केल्याने मोर्चेकरी महिला अधिकच भडकल्याने त्यांनी उपसरपंच, सर्कल, कर्मचाऱ्यांना कार्यालयाला टाळे ठोकून डांबून ठेवले. पाण्यासाठी महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महसूल यंत्रणा चांगलीच खडबडून जागी झाली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी मोर्चेकरी शेषराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून येत्या दोन दिवसात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रि या पूर्ण करून ग्रामस्थांना पाणी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर डांबून ठेवलेल्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल चार तासांनंतर सुटका करण्यात आली. मोर्चात शेषराव पाटील यांच्यासह महेंद्र अहिरे, समाधान अहिरे, अमृत अहिरे, बबलू पाटील, मुन्ना पाटील, किशोर अहिरे, काशीनाथ पाटील, योगेश पाटील, वत्सला पाटील, कमल अहिरे, लीलाबाई अहिरे यांच्यासह दीडशेहून अधिक महिला, पुरु ष सहभागी झाले होते. (वार्ताहर)

 

Web Title: Women's Cemetery Front for Water at Chirai