नाशिकरोडला महिलेची हत्त्या
By Admin | Updated: May 22, 2017 19:53 IST2017-05-22T19:53:03+5:302017-05-22T19:53:03+5:30
एका महिलेच्या डोक्यात गंभीर दुखापत करून हत्त्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली.

नाशिकरोडला महिलेची हत्त्या
नाशिक : येथील नाशिकरोडमधील जेलरोड भागातील मध्यवर्ती कारागृहसमोर असलेल्या कैलासजी सोसायटीत (सी-१) पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत एका महिलेच्या डोक्यात गंभीर दुखापत करून हत्त्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. सदर हत्त्या चार दिवसांपुर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. उपनगर पोलिसांनी याप्रकरणी संशयित विजय गव्हाणे यास ताब्यात घेतले आहे. अद्याप महिलेच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये असल्याने ओळख पटविण्यसाठी अडथळा निर्माण होत आहे.