रेल्वे डब्यात राहणार आता महिला पोलिसांची गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:44 AM2019-11-01T01:44:03+5:302019-11-01T01:44:18+5:30

नाशिकरोड : दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे.

Women police patrols will now remain in the train compartment | रेल्वे डब्यात राहणार आता महिला पोलिसांची गस्त

रेल्वे डब्यात राहणार आता महिला पोलिसांची गस्त

googlenewsNext

नाशिकरोड : दिवाळीच्या सुटीमुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाशिकरोड रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे.
दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिल्लीला आठवड्यातून तीनदा जाणाºया राजधानी एक्स्प्रेसमध्ये नाशिकरोड येथून दोन महिला पोलीस व एक जवान जळगावपर्यंत रेल्वेमध्ये गस्त घालतात. जळगावहून हावडा मेलने पुन्हा महिला व पुरुष पोलीस कर्मचारी गस्त घालत नाशिकरोडला येतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या पद्धतीची गस्त कायम ठेवून गस्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना शस्त्रदेखील देणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांनी सांगितले.
नाशिकरोड आरपीएफची हद्द घोटीपासून कसबे सुकेणेपर्यंत असली तरी जळगावपर्यंत रेल्वेगाड्यात गस्त घातली जात आहे. यापूर्वी रेल्वेत पुरु ष कर्मचारी गस्त घलण्याचे काम करीत होते. आता महिला कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वेस्थानक व प्रवासादरम्यान चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. त्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने पोलीस गस्त वाढविल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Women police patrols will now remain in the train compartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे