ट्रक अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:51 IST2019-03-03T15:50:27+5:302019-03-03T15:51:01+5:30
पिंपळगाव बसवंत :येथील वाळूवाहणाऱ्या ट्रकने विचुरंच्या दांपत्याला सारोळेखुर्द ता. निफाड येथे रात्री साडे दहा वाजता चिरडून पळ काढला. त्यात जयश्री दिलीप दरेकर या महिलेचा जागेवर मुत्यू झाला आहे.तर दिलीप दरेकर हे गंभीर जखमी आहे त्यांचा खाजगी रु ग्णालयात उपचार चालू आहे.

महिलेला चिरडणारा पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात जमा असलेला ट्रक
पिंपळगाव बसवंत :येथील वाळूवाहणाऱ्या ट्रकने
विचुरंच्या दांपत्याला सारोळेखुर्द ता. निफाड येथे रात्री साडे दहा वाजता चिरडून पळ काढला. त्यात जयश्री दिलीप दरेकर या महिलेचा जागेवर मुत्यू झाला आहे.तर दिलीप दरेकर हे गंभीर जखमी आहे त्यांचा खाजगी रु ग्णालयात उपचार चालू आहे.
विंचुरचे दरेकर दांपत्य आपल्या मोटारसायकलने घरी जात असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.या अपघातात दांपत्याला ट्रकने ओडत नेले त्यात दिलीप दरेकर हे बाहेर फेकले गेले.तर जयश्री दरेकर या गाडीच्या मागील चाकाखाली गेल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला .गाडी न थाबंवत जोराने चालवत ट्रक चालकाने पळ काढला व पिंपळगाव पोलीस ठाण्यातहजर झाला.