कळवण-देवळा रस्त्यावर अपघातात महिला ठार
By Admin | Updated: December 24, 2015 23:51 IST2015-12-24T23:32:26+5:302015-12-24T23:51:46+5:30
कळवण-देवळा रस्त्यावर अपघातात महिला ठार

कळवण-देवळा रस्त्यावर अपघातात महिला ठार
कळवण : कळवण - देवळा रस्त्यावर निवाणे गावाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर इंडिका कार आदळून झालेल्या अपघातात कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला, एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत कळवण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गावित करीत आहेत.
बुधवारी (दि. २३) रात्री लग्नसमारंभाचा कार्यक्रम रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान हेमंत मुरलीधर सागर व पत्नी वैशाली हेमंत सागर (३८, रा. ओतूर, ता. कळवण) हे इंडिका कारने (क्र. एमएच १५ सीडी ७२१८) देवळा येथून येत असताना निवाणेनजीक रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर इंडिका आदळून अपघात झाला. अपघातात वैशाली सागर यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर पती हेमंत मुरलीधर सागर जखमी झाले. सदर घटनेची माहिती कळताच कळवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, कळवण येथे हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात वैशाली हीस मयत घोषित करण्यात आले व पती हेमंत मुरलीधर सागर यांच्यावर उपचार करण्यात आले.
याबाबत कळवण पोलिसांत मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगन पवार पुढील तपास करीत
आहेत. (वार्ताहर)