अपघातात महिला ठार
By Admin | Updated: April 10, 2017 01:14 IST2017-04-10T01:14:36+5:302017-04-10T01:14:49+5:30
पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीसाठी जात असताना झालेल्या अपघातात महिलेचा जागेवर मृत्यू झाला.

अपघातात महिला ठार
पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंतीच्या मिरवणुकीसाठी जात असताना झालेल्या अपघातात महिलेचा जागेवर मृत्यू झाला.
पिंपळगाव बसवंत येथे सकाळी ९ वाजता महावीर जयंतीनिमित्त मिरवणुकीची तयारी झाली होती. अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या जुन्या आग्रा रोडवरून सुरेश कांकरिया हे पत्नी चंद्रकला (५६) यांना मोटारसायकलवरून सोबत घेऊन मिरवणुकीसाठी जात असताना मोटारसायकलवरून तोल गेल्याने चंद्रकला या रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी समोरून द्राक्ष भरण्यासाठी येणाऱ्या ट्रकच्या (क्र. यूपी ३२ जीएन ९५९९) चाकाखाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. महावीर जयंतीची होणारी मिरवणूक तत्काळ रद्द करण्यात आली. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी ट्रकचालक रामू मुन्ना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)