शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या रस्त्यांवर महिला असुरक्षित; दुचाकीस्वार महिलेची सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 19:27 IST

चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्देमहिलांमध्ये संतापाची लाट पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना

नाशिक : शहर व परिसरात दररोज सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना पोलिसांच्या हाती मात्र अद्याप एकही चोरटा लागलेला नाही, हे विशेष! मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा मायकोसर्कलजवळ एका दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार झाले.फिर्यादी भारती सिताराम जाधव (३०, रा.कमलनगर, कामटवाडे) या बुधवारी (दि.७) काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रात्री दहा वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरी परतत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे जाधव या पायी जात नव्हत्या तर त्र्यंबकरोडने त्यांच्या ज्युपीटर या मोपेड दुचाकीने (एम.एच २१ बी ८९९९ ) घरी मार्गस्थ होत होत्या. तरीदेखील चोरट्याने त्य्एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पलायन केले. यावेळी जाधव यांच्या शरिराला हिसका बसला; मात्र सुदैवाने त्यांनी दुचाकीसह तोल संभाळल्याने कोसळल्या नाही, अन्यथा गंभीर दुखापत झाली असती. याप्रकरणी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात सोनसाखळी चोराविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. महिलांना रस्त्यांवरुन पायी तर सोडाच मात्र दुचाकीनेसुध्दा मार्गस्थ होणे आता सुरक्षित राहिले नसल्याचे या घटनेवरुन दिसून येते. चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली.महिला भयभीत; पोलीस अपयशीशहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज सोनसाखळ्या चोरटे हिसकावून पोलिसांना आव्हान देत आहेत; मात्र पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांसह शहर गुन्हे शाखा युनीट-१ व २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेलासुध्दा या सोनसाखळी चोरांना बेड्या ठोकण्यास अपयश येत असल्याने महिलावर्गांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनसाखळी खेचून पलायन केल्याचा दररोज एक तरी गुन्हा शहरातील तेरापैकी एका पोलीस ठाण्यात काही दिवसांपासून दाखल होत आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारी