कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक
By Admin | Updated: November 6, 2014 00:18 IST2014-11-06T00:09:44+5:302014-11-06T00:18:34+5:30
कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक

कारखान्यात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक
सातपूर : कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांसाठी महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीची स्थापना लवकरात लवकर करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक अशोक डोंगरे यांनी कारखान्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांवरील लैंगिक छळवणूक, अत्याचारासंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार कारखान्यात एक जरी महिला कामगार काम करीत असेल अशा कारखान्यामध्ये महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे. सदर समिती गठित करून तसा अहवाल पाठवून या समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात. त्याचाही अहवाल कार्यालयात पाठविण्यात यावा. महिला तक्रार निवारण समिती गठित केली नाही तर संबंधित कारखान्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक अशोक डोंगरे यांनी आस्थापनांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे. (वार्ताहर)