कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने येवल्यात महिला समुपदेशन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST2018-01-16T23:55:45+5:302018-01-17T00:20:22+5:30

येवला : शहरातील कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली.

Women Counseling Center at Yeola, organized by Ranjana Plateau Multi-Oriented Organization in front of the Kanda Market | कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने येवल्यात महिला समुपदेशन केंद्र

कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने येवल्यात महिला समुपदेशन केंद्र

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन समुपदेशन हाच प्रभावी उपचार

येवला : शहरातील कांदा मार्केटसमोर रंजना पठारे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महिला समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती आशा साळवे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदच्या सदस्य सविता पवार, पं. स. सदस्य लक्ष्मीबाई गरुड, शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील, तालुका पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगरसेवक अमजद शेख उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सविता पवार म्हणाल्या, आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस व्यस्त आहे. महिलांच्या प्रश्नांची कोणीही पाहिजे अशी दखल घेत नाही. कित्येक महिलांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी किंवा योग्य सल्ला न मिळाल्यामुळे अन्याय व अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. यावर समुपदेशन हाच प्रभावी उपचार असल्याचे पवार यांनी अधोरेखित केले. यावेळी रेखा साबळे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांचीही भाषणे झाली. महेंद्र पगारे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन आशा आहेर यांनी केले. यावेळी शीतल आहेर, रंजना पठारे, कांताबाई गरुड, संगीता आहिरे, अनुपमा मढे, ज्योती पगारे, जायरा अन्सारी, मालती पगारे, रुबिना जगताप, रखमाई गायकवाड, संगीता तळेकर, शोभा घोडेराव, राजाभाऊ बनसोडे, बाळासाहेब आहिरे, शशिकांत जगताप, विजय घोडेराव, बाळासाहेब गायकवाड, सुरेश सोनवणे, अजहर शेख, हमजा मन्सुरी, अजिज शेख, आकाश घोडेराव, तेजस घोडेराव, अनिल झाल्टे, संजय आहिरे, नाना शिंदे, विकास दुनबळे, सागर गरुड, गौरव साबळे, विजय गायकवाड, सागर गायकवाड, सुभाष गांगुर्डे, विधाता आहिरे, प्रशांत शिंदे, नितीन शिंदे, सिंधूबाई पठारे, सागर पगारे, अरु ण आव्हाड आदींसह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women Counseling Center at Yeola, organized by Ranjana Plateau Multi-Oriented Organization in front of the Kanda Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला