सातपूर : कौटुंबिक वादातून महिलेस तिघांनी भररस्त्यात मारहाण केल्याची घटना सातपूर गावात घडली. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार रंजना मनोज चव्हाण (४५) रा. स्वामी समर्थ चौक, सातपूर ही महिला रस्त्याने जात असतांना किशोर ऊर्फ संजय रामलाल चव्हाण, मनीषा संजय चव्हाण, प्रेरणा संजय चव्हाण यांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी संंबंधित महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक मजगर पुढील तपास करीत आहेत.
सातपूरला भररस्त्यात महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:28 IST