पिंपळगाव पोलीस स्थानकात महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:01 IST2020-03-09T15:01:04+5:302020-03-09T15:01:28+5:30

पिंपळगाव बसवंत: जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव बसवंत पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य परिचारिका व अंबिकानगर येथील आदिवासी महिलांचा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .

  Women are honored at Pimpalgaon Police Station | पिंपळगाव पोलीस स्थानकात महिलांचा सत्कार

पिंपळगाव पोलीस स्थानकात महिलांचा सत्कार

ठळक मुद्दे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करु न अभिवादन करण्यात आले .


यावेळी पोलीस निरीक्षक संजय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे ,महिला पोलीस कर्मचारी प्रमिला राठोड, चंद्रभागा कराड ,आदीसह सारिका बिडवे,रंजना गिहले,रंजनाबाई गांगुर्डे ,विमल गांगुर्डे ,मंदा गांगुर्डे ,लता घोरपडे, मंजुळा डोंबाळे ,वंदना टोंगरे,रंजना डांबले,हिराबाई धुळे, लताबाई पीठे,शिंदूबाई पवार,बायजबाई भोये,अक्काबाई पवार,सूनम पवार,मंदाबाई पवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 

Web Title:   Women are honored at Pimpalgaon Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.