महिला बालकल्याण समिती महासभेत करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:06+5:302021-09-21T04:16:06+5:30
राज्यात नाशिकवगळता सर्वच महापालिकांकडून अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना घरपोच पोषण आहार दिला जात आहे. निधी असून आहार का दिला जात ...

महिला बालकल्याण समिती महासभेत करणार उपोषण
राज्यात नाशिकवगळता सर्वच महापालिकांकडून अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना घरपोच पोषण आहार दिला जात आहे. निधी असून आहार का दिला जात नाही, असा प्रश्न भामरे यांनी केला. अंगणवाडीसेविकांना दोन हजार रुपये मानधन वाढवून देण्याचा निर्णय महासभेने घेतला, मात्र एक हजार रुपये वाढतील एवढीच तरतूद असल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले. त्यामुळे समितीने दाेनऐवजी एक हजार रुपये वाढवून देण्याबात सुधारित ठराव केला, मात्र त्याचीही अंमलबजावणी नाही तर दुसरीकडे महिला प्रशिक्षणाचा ठेका देण्याचा घोळ चार वर्षांपासून सुरू आहे नवीन निविदा मागवूनदेखील पंधरा दिवस उमटले मात्र तरीही त्यावर निर्णय नाही, असा प्रश्न भामरे यांनी उपस्थित केला आणि आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर हंगामी महापौर गणेश गिते यांनी तातडीने सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत.
इन्फो..
समितीच्या निर्णयामुळेच विलंब?
उपआयुक्त अर्चना तांबे यांनी पोषण आहाराचा ठेका अंतिम हाेत असतानाच समितीने नवीन बचतगटांना सामावून घेण्यासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे विलंब झाल्याचे सांगितले. त्यावर भामरे यांनी समर्थन करून विशिष्ट बचतगटांनाच नाही तर सर्व महिलांना कामे मिळवण्यासाठीच नव्याने निविदा मागवाव्या तसेच नव्या बचतगटांना प्रशिक्षण द्यावे असा ठराव केला. यासंदर्भात निर्णयदेखील अनेक महिन्यांपूर्वीच झाला मात्र, तरीही पोषण आहार देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची तक्रार भामरे यांनी केली.,