नाशकातील पाथर्डी फाटा भागात खेचले महिलेचे मंगळसूत्र
By नामदेव भोर | Updated: June 16, 2023 15:30 IST2023-06-16T15:30:02+5:302023-06-16T15:30:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा येथील नंदनवन कॉलनीतून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भाजी घेऊन पायी घरी ...

नाशकातील पाथर्डी फाटा भागात खेचले महिलेचे मंगळसूत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा येथील नंदनवन कॉलनीतून रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भाजी घेऊन पायी घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे पंधरा हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता साहेबराव बुटे( ४२, गोकुळ पार्क, श्री स्वामी समर्थनगर, पाथर्डी फाटा) यांनी गुरुवारी (दि.१५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना भाजी बाजारातून भाजी घेतली. त्यानंतर नंदनवन कॉलनीतून पाय घरी येत असताना पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने बुटे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. परंतु बुटे यांनी हाताने धरून ठेवल्याने मंगळसुत्राचा एक भाग त्यांच्या हातात राहिला. तर दुसरा भाग चोरट्यांनी खेचून पळ काढला. त्यामुळे सुमारे पंधरा हजार रुपयांचे सोने असलेली मंगळसुत्राची एक सर चोरट्यांनी चोरून नेल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.