शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

डॉक्टरकडे अडीच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिला वकिलाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:44 IST

कोणतीही चूक नसताना रक्कम का म्हणून द्यावयाची, असा विचार सदर डॉक्टर महिलेच्या मनात आल्याने त्यांनी पाटील यांचे कार्यालय गुरुवारी दुपारी गाठून घडलेला प्रकार कथन केला.

ठळक मुद्देअ‍ॅड. कामिनी माणिकशा खेरुडकर या पेशाने वकील साध्या वेशात सापळा रचला डॉक्टर महिलेचा कॉल ट्रॅप करत मुंबईनाका व सरकारवाडा पोलिसांनी महामार्ग परिसरात सापळा खेरुडकरसह तिचे साथीदार मधुकर यशवंत नाठे, कमलेश विष्णू लांडगे, अर्जुन तुकाराम रणशूर यांना ताब्यात घेतले.

नाशिक : ‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर परिसरात राहणाºया एका महिला डॉक्टरकडे अडीच लाख रुपयांची खंडणी  मागणाऱ्या अ‍ॅड. कामिनी माणिकशा खेरुडकर या पेशाने वकील असलेल्या महिलेला पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनाका पोलिसांनी अटक केली. खेरुडकर हिने सातत्याने महिला डॉक्टरला धमकावून अडीच लाख रुपये देण्यासाठी दबाव वाढविला होता. कोणतीही चूक नसताना रक्कम का म्हणून द्यावयाची, असा विचार सदर डॉक्टर महिलेच्या मनात आल्याने त्यांनी पाटील यांचे कार्यालय गुरुवारी दुपारी गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सारिका आहिरराव व पवार यांना तातडीने बोलावून सदर प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी कागदाचे बंडल नोटांच्या आकाराचे तयार करून ते एका पिशवीत भरून डॉक्टर महिलेला खेरुडकर हिने ज्या पत्त्यावर बोलविले तेथे नेऊन देण्यास सांगितले. प्रथम खेरुडकर हिने डॉक्टरला कॅनडा कॉर्नरवर रक्कम घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी तेथे साध्या वेशात सापळा रचला; मात्र उपयोग झाला नाही. खेरुडकर हिने पुन्हा पत्ता बदलून महामार्ग स्थानकाजवळ मुंबई नाका येथे येण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर महिलेचा कॉल ट्रॅप करत मुंबईनाका व सरकारवाडा पोलिसांनी महामार्ग परिसरात सापळा रचला. या ठिकाणी डॉक्टर सदर कागदाचे बंडल भरलेली पिशवी घेऊन पोहचले. त्यांनी खेरुडकर यांच्या हातामध्ये पिशवी सोपविली असता दबा धरून बसलेल्या महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी झडप घालून खेरुडकरसह तिचे साथीदार मधुकर यशवंत नाठे, कमलेश विष्णू लांडगे, अर्जुन तुकाराम रणशूर यांना ताब्यात घेतले.