विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: July 23, 2014 00:35 IST2014-07-22T01:29:54+5:302014-07-23T00:35:21+5:30
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्यावरील उड्डाणपुला-जवळील खैरनार वस्ती येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाधरी ग्रामपंचायतीचे शिपाई सुधाकर खैरनार यांच्या पत्नी जयश्री (३५) या रविवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कपडे धुण्यासाठी रेल्वेलाइन-शेजारी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्या. मात्र त्यावेळी कुणाचेही लक्ष न गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नांदगाव कडे येणाऱ्या रेल्वे मालवाहतूक गाडीच्या गार्डच्या ते लक्षात आल्याने त्याने चालू गाडीतून वस्तीवरील नागरिकांना ओरडून खबर दिली.
खैरनार यांच्या पश्चात पती व २ मुले असा परिवार आहे. (वार्ताहर)