काजीसांगवी येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: October 9, 2015 22:57 IST2015-10-09T22:57:27+5:302015-10-09T22:57:52+5:30
काजीसांगवी येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

काजीसांगवी येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
चांदवड : काजीसांगवी येथील विवाहिता शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आली. सोनीसांगवीचे पोलीसपाटील पंढरीनाथ ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिली. मनीषा योगेश ठाकरे (२५), रा. काजीसांगवी ही विवाहिता गुरुवारी (दि. ८) सकाळपासून कोणासही काही न सांगता घरातून निघून गेली होती. शुक्रवारी (दि. ९)दुपारी साडेबाराच्या सुमारास घराजवळील विहिरीत मयत अवस्थेत मिळून आली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत मनीषाचा मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर काजीसांगवी येथे वातावरण तापले होते. (वार्ताहर)