दुचाकीस्वारांनी खेचली महिलेची साखळी
By Admin | Updated: May 17, 2017 18:17 IST2017-05-17T18:17:04+5:302017-05-17T18:17:04+5:30
शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकली.

दुचाकीस्वारांनी खेचली महिलेची साखळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून धूम ठोकली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूपाली धनराज कोळंबे(२९) रा. माणिकमोती निवास, विसेमळा, कॉलेजरोड यांनी याप्रकरणी तक्र ार दाखल केली आहे. कोळंबे या २४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजाऱ्यांसह फेरफटका मारण्यासाठी निघाल्या असताना रामदास गार्डन भागातून दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे पेंडल असलेली सोन्याची चेन चोरून नेली.