शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बसप्रवासात महिलेची रोकड लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 17:09 IST

नाशिक : बसप्रवासात महिलेच्या पर्समधून साडेचौदा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी नाशिकरोड बसस्थानकावर घडली़

ठळक मुद्दे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : बसप्रवासात महिलेच्या पर्समधून साडेचौदा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़३१) सकाळी नाशिकरोड बसस्थानकावर घडली़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील रहिवासी सीमा सुरेश गायकवाड (रा. बिल्डिंग नंबर २८०, भातनकर मार्ग, परळ स्टेशनजवळ) या सोमवारी सकाळी नाशिकरोड बसस्थानकावरून कोपरगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून रोकड चोरून नेले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़महिलेच्या पर्सची चोरीनाशिक : बोरगड परिसरातील सुरेखा रसाळ (४३) या महिलेची पर्स चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़३०) सकाळच्या सुमारास पंचवटीतील आरोग्य भवनजवळ घडली़ या पर्समध्ये साडेतीन हजार रुपये रोख, पॅनकार्ड, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, एटीएम व मोबाइल फोन होता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सिडकोत तरुणाची आत्महत्यानाशिक : लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीतील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ भारत दिलीप दांडेकर असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तरुणाचा मोबाइल लांबविलानाशिक : तपोवन रोडवरील रहिवासी गणेश मिसाळ या युवकाचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी सारडा सर्कल परिसरातून शनिवारी (दि़२९) सकाळच्या सुमारास लांबविला़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस