पेठ : तालुक्यातील हरणगाव येथील देवरत्न धरणात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.बुधवारी ( दि. २४) रोजी सकाळी हरणगाव धरणाच्या फुगवटा क्षेत्रात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्याबाबत पोलीसपाटील निवृत्ती पवार यांनी पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. सदर मृतदेह दिंडोरी तालुक्यातील चिल्लारपाडा येथील कमल हेमराज गायकवाड (३७) या महिलेचा असल्याचे समजले.पेठच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात शव देण्यात आले. याबाबत पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप जव्हेरी पुढील तपास करीत आहेत.
हरणगाव धरणात महिलेचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:51 IST
पेठ : तालुक्यातील हरणगाव येथील देवरत्न धरणात एका ३७ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही.
हरणगाव धरणात महिलेचा मृतदेह
ठळक मुद्दे पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद