शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

नारी तू न अबला... तू तर सबला..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 02:26 IST

कायद्याचे संरक्षण : वेळप्रसंगी दाखवावे दुर्गारूप अन् निर्भयपणे शिकवावा धडा

अझहर शेख 

नाशिक : महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीच्या निर्भयानंतर हैदराबादच्या ‘दिशा’ प्रकरणाने देश हादरला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्यातील दुर्गारूप महिलांनी दाखवावे. सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे बघत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कायद्याचेही महिलांना संरक्षण प्राप्त आहे. त्यामुळे आपल्याकडे वक्रदृष्टी करू पाहणाऱ्यांना निर्भयपणे कायदेशीर धडा शिकविण्यासाठी महिलांनी थेट पोलिसांकडे धाव घ्यायला हवी. समाजातील विकृत प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आता महिलांनी पुढे येण्याची गरज आहे.

महिला, युवतींची छेडछाड, हुंड्यासाठी विवाहितेचा होणारा छळ, विकृत प्रवृत्तीतून महिला, युवतींचा होणारा विनयभंग, बलात्कार, सोशल मीडियाद्वारे युवतींचा पाठलाग, अश्लील चॅटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना घडल्याचे दररोज आपल्या कानांवर येते. राज्यात महिलांविषयी घडणाºया गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक आहे. महिलांच्या बाबतीतभारतीय दंडविधान संहितेत कायद्याचे संपूर्ण कवच महिलांना प्राप्त आहे. विविध कलमांन्वये दोषींना सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोर अशी शिक्षेची तरतूद आहे.महिलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला तर कोणतेही पोलीस ठाणे त्याबाबत हलगर्जीपणा दाखवू शकत नाही. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी. जेणेकरून संबंधित गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करून त्यास कायद्याने कठोर अशी शिक्षा पोलिसांना मिळवून देता येईल. त्यामुळे समाजातील अपप्रवृत्ती व महिलांविरुद्ध घडणाºया अत्याचाराच्या घटनांनाही आळा बसण्यास मदत होईल. महिलांनी आपल्या न्यायव्यवस्थेवर भक्कम विश्वास ठेवून नि:संकोचपणे दाद मागावी.काय काळजी घ्याल?...अशी बाळगा सावधगिरीच्तुमच्यातील आत्मविश्वास, धैर्य अन् धाडस जागे ठेवा. स्वसंरक्षणाचे धडे अवश्य आत्मसात करून घ्या.च्अतिप्रसंगाच्या वेळी घाबरून न जाता धैर्याने प्रत्युत्तर द्या. घरी, प्रवासात अथवा निर्जन किंवा गर्दीच्या ठिकाणी अतिप्रसंगाची वेळ ओढावली तर मोठ्याने आरडाओरडा करा, अशा वेळी कुठलाही संकोच बाळगू नका.च्आपला ‘सिक्स सेन्स’ अर्थात सहावे इंद्रिय जागृत ठेवा. आपल्याकडे असलेल्या स्मार्ट मोबाइल फोनचा योग्य वापर करा. तत्काळ हेल्पलाइन क्रमांक डायल करा.च्पर्समध्ये असणारा पेन, कटर, डोक्याची क्लिपसह स्टोेलचाही वेळेप्रसंगी शस्त्र म्हणून वापर करा. सार्वजनिक ठिकाणी तुमच्याकडे एकटक बघत संशयास्पद हालचाल करणाºयांपासून वेळीच सावध व्हा अन् स्मार्टफोनचा खुबीने वापर करा.संशयित आरोपी १८ ते २२ वयोगटातीलच्विनयभंग, बलात्कार यांसारख्या बहुतांश घटनांमध्ये पोलीस तपासातून संशयित आरोपी हा पीडितेला ओळखणारा असतो किंवा दोन्ही एकमेकांना ओळखणारे असतात.च्तसेच पीडित अल्पवयीनदेखील असल्याचे समोर आले आहे़ तसेच बहुतांश वेळा आरोपी हा १८ ते २२ वर्षे वयोगटातील असल्याचे आढळले आहे. यामुळे या वयोगटातील मुलांकडे अधिक लक्ष देण्याची पालकांची मोठी जबाबदारी आहे.च्तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये महिला, मुलींच्या गुन्हे व शिक्षा याविषयी जागरूकता आणण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याची गरज आहे.कायदेशीर कलमांन्वये तरतुदी अशा...महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घडणाºया गुन्ह्यांबाबत भारतीय दंडविधान संहितेतील काही निवडक कायदेविषयक तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. या तरतुदी व त्यांच्या शिक्षेचे स्वरूप लक्षात घेतल्यास महिलांविरुद्ध घडणारे गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकते.च्कलम-३५४ - विनयभंग.च्कलम-३५४ अ - स्पर्श करणे, लैंगिक सुखाची मागणी करणे.च्कलम - ३५४ ब- विनयभंग करण्याच्या उद्देशाने शारीरिक इजा पोहोचविणे.च्कलम - ३५४ क - अश्लील चित्रीकरण करणे.च्कलम- ४५४ ड- प्रत्यक्ष किंवा इंटरनेटच्या कुठल्याही माध्यमातून पाठलाग करणे.च्कलम- ३२६ अ - अ‍ॅसिडसारख्या कुठल्याही घातक वस्तू व ज्वलनशील द्रव्यरूप पदार्थांद्वारे इजा पोहोचविणे.च्कलम ३२६ ब - अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न करणे.च्कलम ५०९ - विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील शब्दोच्चार, हावभाव करणे.च्कलम - ३७० अ (१) बालकांचा अनैतिक व्यापार व तस्करीसाठी लैंगिक शोषण किंवा छळ.च्कलम- ३७० अ (२) अनैतिक व्यापार करून लैंगिक शोषणाकरिता छळ.च्कलम- ३७६ - बलात्कार.च्कलम- ३७६ अ- बलात्कार करून घातक इजा पोहचविणे, की ज्यामुळे पीडितेचा मृत्यू होतो किंवा त्या पीडित स्त्रीला कायमस्वरूपी अपंगत्वास कारणीभूत ठरणे.च्कलम- ३७६ ब- विभक्त होत असताना पत्नीशी संभोग वा समागम करणे.च्कलम- ३७६ क- अधिकारी दर्जाच्या व्यक्तीने आपल्या हाताखालील महिला कर्मचाºयाशी संभोग, समागम करणे.च्कलम ३७६ ड- सामूहिक बलात्कार करणे.च्कलम ३७६ इ - पुन्हा पुन्हा बलात्काराचा प्रयत्न करणे.प्रमुख पोलीस नियंत्रणकक्षांचा संपर्क क्रमांकराज्यस्तर (मुंबई) : ०२२-२२८२२६३१व्हॉट्सअ‍ॅप मो : ७००६७७७१००नवी मुंबई : ०२२- २७५६१०९९व्हॉट्सअ‍ॅप मो : ८४२४८२०६६५ठाणे शहर : ०२२ - २५४४३६३६व्हॉट्सअ‍ॅप मो : ९७६९७२४१२७पुणे शहर : ०२०- २६१२६२९६व्हॉट्सअ‍ॅप मो : ८९७५२८३१००नागपूर शहर : ०७१२ : २५६१२२२व्हॉट्सअ‍ॅप मो : ८०५५८७६७७३नाशिक शहर : ०२५३ : २३०५२३३व्हॉट्सअ‍ॅप मो : ९७७३६७७७३१नाशिक ग्रामीण : २३०९७१५व्हॉट्सअ‍ॅप मो : ८३९०८२१९५२अमरावती शहर : ०७२१ : २५५१०००व्हॉट्सअ‍ॅप मो : ९९२३०७८६४६औरंगाबाद शहर : ०२४० : २२४०५००व्हॉट्सअ‍ॅप मो : ८३९००२२२२२सोलापूर शहर : ०२१७ : २७४४६००व्हॉट्सअ‍ॅप मो : ९४२२९५०००३अहमदनगर : ०२४१ : २४१६१००व्हॉट्सअ‍ॅप मो : ९६६५८८७००९जळगाव : ०२५७ : २२२३३३३व्हॉट्सअ‍ॅप मो : ९४२२२१०७०१धुळे : ०२५६२ : २८८२११व्हॉट्सअ‍ॅप मो : ९४०४१५३५२० 

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला