महिलेची पोत खेचली
By Admin | Updated: October 18, 2015 23:22 IST2015-10-18T23:21:49+5:302015-10-18T23:22:14+5:30
महिलेची पोत खेचली

महिलेची पोत खेचली
नाशिक : भाजी आणण्यासाठी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१७) सायंकाळी द्वारका परिसरात घडली़
माणेकशानगरमध्ये राहणाऱ्या सुचिता महेश सादरे या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील बाजारातून भाजी आणण्यासाठी पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ आल्यानंतर गाडीचा वेग कमी केला, तर पाठीमागे बसलेल्या दुसऱ्याने सुचिता सादरे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून पळ काढला़
या प्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)