सटाणा : महिलेला पळवून नेल्या प्रकरणी फरार संशयित आरोपीला बुधवारी (दि.१४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले.बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील देविदास रतन पवार यांनी एका महिलेला पळवून नेल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि.कलम ३६३,३६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो गेल्या काही महिन्यांपासून फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांना तो लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार नामदेव खैरनार, ए. एस. जगताप, पोलीस कॉन्स्टेबल पवार, बहिरम यांनी सटाणा शहरातील चौगाव बर्डीच्या डोंगराजवळ सापळा रचून लपून बसलेल्या देविदास पवार याला अटक केली. सटाणा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला जायखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत.
महिलेला पळवून नेणारा फरार संशयित गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:35 IST
सटाणा : महिलेला पळवून नेल्या प्रकरणी फरार संशयित आरोपीला बुधवारी (दि.१४) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले.
महिलेला पळवून नेणारा फरार संशयित गजाआड
ठळक मुद्देफरार संशयित आरोपीला जायखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.