‘ब्लॅकमेल’ करून नाशिकमध्ये युवतीला ढकलले देहविक्रीच्या दलदलीत; कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूटिंग
By अझहर शेख | Updated: May 13, 2023 16:56 IST2023-05-13T16:55:41+5:302023-05-13T16:56:30+5:30
संशयित पती-पत्नीला पोलिसांनी हुडकून काढत बेड्या ठोकण्याची मागणी पंचवटी भागातून होत आहे.

‘ब्लॅकमेल’ करून नाशिकमध्ये युवतीला ढकलले देहविक्रीच्या दलदलीत; कपडे बदलतानाचे व्हिडीओ शूटिंग
नाशिक : एका बेरोजगार युवतीला नोकरीचे आमीष दाखवून देहविक्रयच्या दलदलीत स्वत:च्या आर्थिक लाभासाठी ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित पती-पत्नीला पोलिसांनी हुडकून काढत बेड्या ठोकण्याची मागणी पंचवटी भागातून होत आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या २१वर्षीय पrडित फिर्यादी युवतीला संशयित खुशबु परेश सुराणा व तीचा पती संशयित परेश सुराणा यांनी नोकरीचे आमीष दाखविले. यानंतर संशयित परेश याने तिच्याइच्छेविरूद्ध बळजबरीने १५ ते २५ फेब्रुवारीदरम्यान शारिरिक संबंध ठेवून शारिरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित परेश व त्याची पत्नी खुशबु हिच्याविरूद्ध बलात्कार व पिटाकायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या दोघा संशयितांचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.
पीडित फिर्यादी युवती नोकरीच्या शोधार्थ शहरात आली होती. ती पंचवटी भागात एकटीच वास्तव्यास होती. फेब्रुवारी महिन्यात सुराणा दांम्पत्याशी तिची ओळख झाली. संशयित सुराणा दाम्पत्याने युवतीचे राहते घर गाठून आपल्याला शॉपिंगला जायचे आहे असे सांगत सोबत येण्याचा आग्रह धरला. यावेळी युवत आपल्या बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असता संशयितांनी मोबाइलद्वारे तिचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. दोन दिवसानंतर उलटत नाही तोच मद्याच्या नशेत युवतीच्या घरी पोहचलेल्या संशयित परेश याने तिच्यावर बलात्कार केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच स्वत:च्या आर्थिक कमाईसाठी पिडितेला अन्य ग्राहकांकडे पाठवून बळजबरीने देहविक्रय करण्यास भाग पाडले. संशयित दाम्पत्याकडून वारंवार दबाव व छळ वाढल्याने अखेर पिडितेने पंचवटी पोलिस ठाणे गाठले. स्वत:सोबत घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देत तक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुराणा दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यांच्याविरूद्ध यापुर्वीही अशाप्रकारची कारवाई झाल्याची परिसरात चर्चा आहे.