शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेकोटीचा भडक्यात महिला होरपळून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 02:40 IST

चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बचावासाठी झोपडपट्टी भागासह गोदाकाठालगत तसेच पंचवटी, जुनेनाशिकसारख्या गावठाण भागात नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघाडीत अशाचप्रकारे शेकोटीभोवती बसलेले असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने एका फिरस्त्या महिलेचा त्यामध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तसेच दोघे जखमी झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देदोघे जखमी : थंडीच्या कडाक्यापासून बचावाचा प्रयोग बेतला जीवावर

पंचवटी : चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे बचावासाठी झोपडपट्टी भागासह गोदाकाठालगत तसेच पंचवटी, जुनेनाशिकसारख्या गावठाण भागात नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघाडीत अशाचप्रकारे शेकोटीभोवती बसलेले असताना अचानक आगीचा भडका उडाल्याने एका फिरस्त्या महिलेचा त्यामध्ये होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला तसेच दोघे जखमी झाल्याची घटना घडली.

पंचवटी परिसरातील गोदाकाठालगत असलेल्या वाघाडीतील वसाहतीत बुरूडडोह भागात एका ३०वर्षीय फिरस्त्या महिलेला शेकोटीमध्ये जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात (दि.४) वाघाडी परिसरात महिला व तिच्यासमवेत इतर दोघेजण सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेकोटी पेटवून त्याभोवती बसलेले होते. त्याचवेळी शेकोटीचा मोठा भडका उडाला आणि ज्वाला महिलेच्या साडीला लागल्याने ती गंभीररित्या भाजली. तसेच अन्य दोघा पुरुषांनाही या भडक्याची झळ बसली. या सर्व जखमींना नागरिकांनी तत्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेत जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीने उपचार घेतल्यानंतर रुग्णालयातून पळ काढला तर गंभीर जखमी असलेल्या महिलेचे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.११) निधन झाले. दरम्यान, महिला फिरस्ती असल्याने तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांचा व वारसदारांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू