साेन्याच्या बिस्किटाचा मोह महिलेला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST2021-02-24T04:16:12+5:302021-02-24T04:16:12+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जयवंताबाई चंदर लहामगे (५५,रा. उत्तमनगर, सिडको) या दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जुने सीबीएस ...

The woman was fascinated by Saina's biscuits | साेन्याच्या बिस्किटाचा मोह महिलेला भोवला

साेन्याच्या बिस्किटाचा मोह महिलेला भोवला

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी जयवंताबाई चंदर लहामगे (५५,रा. उत्तमनगर, सिडको) या दुपारी अडीच वाजताच्या सुमारास जुने सीबीएस बसस्थानकावर उतरल्या. यावेळी दोघा अज्ञात संशयितांनी लहामगे त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, चोरट्यांनी त्यांना ‘आजी’ नावाने हाक मारत सोन्याचे बिस्कीट खाली पडल्याचे सांगत भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी लहामगे यांनी ‘ते माझे नाही,’ असे सांगत पुढे चालण्यास सुरुवात केली. यावेळी दोघा चोरट्यांनी पुन्हा त्यांचा पाठलाग करत ‘हे तुमच्याच पिशवीतून पडले आहे, आम्ही तुमचे नुकसान होण्यापासून वाचवित आहोत’ असे सांगून आमिष दाखविले. यावेळी लहामगे या थांबल्या. चोरट्यांनी त्यांच्या हातात बनावट सोन्याचे बिस्कीट देत बक्षिसाची मागणी केली असता, आमिषापोटी लहामगे यांनी त्या चोरट्यांना त्यांच्या गळ्यातील ९५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी काढून दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The woman was fascinated by Saina's biscuits