शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जयभवानीरोड येथे सोनसाखळी चोरट्यास महिलेने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:33 IST

नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या  आहेत.

नाशिक : नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या  आहेत.  श्री तुळजा भवानी मंदिराकडून बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास इंदुराणी धनंजयकुमार सिंग (४२) या रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी पांढºया रंगाच्या प्लेजर स्कूटीवर आलेल्या चोरट्याने इंदुराणी यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून जबरी चोरी करून पळून जाऊ लागला. मात्र इंदुराणी यांनी लागलीच चोरट्याची स्कूटी गाडी पाठीमागून पकडली. मात्र इंदुराणी यांनी शेवटपर्यंत गाडी न सोडल्याने चोरटा गाडीसह खाली पडला व तेथून पळून गेला. इंदुराणी यांनी सदर घटनेची माहिती तत्काळ उपनगर पोलिसांना दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन व गस्त घालणारे पोलीस कर्मचारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्लेजर स्कूटीच्या क्रमांकावरून शोध घेत जयभवानीरोड येथील सोनसाखळी चोरटा संजय रघुनाथ म्हसदे (३७) याच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या. म्हसदे याच्याकडून इंदुराणी यांच्या गळ्यातील ओढलेले अर्धे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. तर दुसºया घटनेत चेहेडी येथील नीलिमा गणेश ताजनपुरे (३५) या स्कूटी गाडीवरून सामनगाव-चेहेडी रस्त्याने घरी जात होत्या. यावेळी पाठीमागून होंडा डिओ दुचाकीवर आलेल्या चोरट्या युवकाने चालत्या गाडीवर नीलिमा ताजनपुरे यांची पावणेदोन तोळे वजनाची ४० हजारांची सोन्याची पोत ओढून नेली. चोरटा महिला पोलीस कर्मचाºयाचा भाऊ? जयभवानीरोड येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून चोरून नेणारा संशयित संजय म्हसदे याची गाडी धाडसी महिला इंदुराणीने पकडून ठेवल्याने चोरटा खाली पडून पळून गेला. मात्र त्या दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हसदे याच्या मुसक्या आवळल्या. संशयित म्हसदे हा एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा भाऊ असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा