महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र खेचले
By Admin | Updated: May 9, 2017 16:49 IST2017-05-09T16:49:49+5:302017-05-09T16:49:49+5:30
महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र खेचले

महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र खेचले
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : शतपावली करणाऱ्या वृद्ध महिला डॉक्टरच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास मुंबई - आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ़मंगला रमाकांत शिरोडे (रा. हनुमाननगर, विक्रीकरभवन मागे, पाथर्डी फाटा) या सोमवारी रात्री जेवनानंतर शतपावली करीत होत्या़ दामोदर चौकातून त्या हॉटेल चांगले-चुंगलेकडे पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ विशेष म्हणजे १ मे रोजी या परिसरातील दोन महिलांचे सोन्याचे दागिने दुचाकीस्वारांनी खेचून नेल्याची घटना घडली होती़
इंदिरानगर परिसरात सोनसाखळी चोरीची गत आठ दिवसांतील ही तिसरी घटना आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़