मखमलाबादरोडवर महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST2021-04-09T04:14:47+5:302021-04-09T04:14:47+5:30

---- पंचवटी : पतीसमवेत मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या दोघा ...

A woman pulled a gold chain on Makhmalabad Road | मखमलाबादरोडवर महिलेची सोनसाखळी खेचली

मखमलाबादरोडवर महिलेची सोनसाखळी खेचली

----

पंचवटी : पतीसमवेत मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यापैकी मागे बसलेल्या चोरट्याने हिसकावून पोबारा केला. ही घटना मखमलाबादरोडवरील गॅस गुदामाजवळ मोकळ्या भूखंडावर घडली.

बुधवारी सायंकाळी विद्यानगर कृष्णलीला अपार्टमेंट येथील रहिवासी माया सुनील वैद्य (५०) या त्यांचे पती सुनील वैद्य यांच्यासोबत पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यानी वैद्य यांच्याजवळ येत दुचाकी हळुवारपणे करत नजर चुकवून त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात पुन्हा सोनसाखळी चोरांनी उच्छाद मांडला असला तरी पोलिसांना सोनसाखळी चोर मिळत नसल्याने महिलांना दिवसा रस्त्याने फिरणे अवघड झाले आहे, तर पोलीस नाकाबंदी करत असतानाही नाकाबंदीतदेखील चोरटे हाती लागत नसल्याने नाकाबंदीचा केवळ देखावा आणि सर्वसामान्य लोकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: A woman pulled a gold chain on Makhmalabad Road