मालसाणे शिवारात ट्रकच्या धडकेने महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:05+5:302020-12-04T04:39:05+5:30

चांदवड तालुक्यातील आसरखेडे येथील उषा रामा पवार (४६) सागर पवार हे दोघेही दुचाकीवरून (क्र. एमएच १५ एफडब्ल्यू ९३५१) ...

Woman killed in truck crash in Malsane Shivara | मालसाणे शिवारात ट्रकच्या धडकेने महिला ठार

मालसाणे शिवारात ट्रकच्या धडकेने महिला ठार

चांदवड तालुक्यातील आसरखेडे येथील उषा रामा पवार (४६) सागर पवार हे दोघेही दुचाकीवरून (क्र. एमएच १५ एफडब्ल्यू ९३५१) मालसाणे येथे जात असताना गतिरोधकाजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचालकाने (क्र. एमएच ०४ जेके ९६७१) पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. त्यातील उषा पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची खबर सागर पवार याने वडाळीभोई पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman killed in truck crash in Malsane Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.