कंटेनरखाली सापडून विद्यार्थिनी ठार

By Admin | Updated: August 21, 2016 00:21 IST2016-08-21T00:20:18+5:302016-08-21T00:21:58+5:30

कंटेनरखाली सापडून विद्यार्थिनी ठार

The woman killed by the container | कंटेनरखाली सापडून विद्यार्थिनी ठार

कंटेनरखाली सापडून विद्यार्थिनी ठार

 पिंपळगाव बसवंत : येथील मुखेडरोडवर कंटेनरखाली चिरडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
पिंपळगाव बसवंत येथील एमआयडीसी भागातून कु. पूजा सर्जेराव खरात (१३) ही सकाळी ७ वाजता सायकलने शाळेत जायला निघाली. त्याच दरम्यान कन्टेनर (क्र. एमएच ०६ एक्यू ८८०४) एमआयडीसीकडे वळण घेत असताना अरुंद वळणावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून पूजा जागीच ठार झाली.
या प्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपनिरीक्षक कराळे करत आहे. (वार्ताहर)

Web Title: The woman killed by the container