तोतया पोलिसांकडून महिलेची फसवणूक

By Admin | Updated: December 22, 2014 00:51 IST2014-12-22T00:50:58+5:302014-12-22T00:51:14+5:30

तोतया पोलिसांकडून महिलेची फसवणूक

Woman fraud | तोतया पोलिसांकडून महिलेची फसवणूक

तोतया पोलिसांकडून महिलेची फसवणूक

नाशिक : तुमच्याकडे खून झाला आहे, अंगावरील दागिने काढून द्या, असे सांगून महिलेच्या अंगावरील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन तोतया पोलिसांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी पंपिंगस्टेशन रोडवर घडली आहे़ शहरात पुन्हा तोतया पोलीस सक्रिय झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़
पंपिंग स्टेशनजवळील सुरसंगम सोसायटीत राहणाऱ्या मीराबाई माधवराव जाधव या शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी जात होत्या़ मामा मुंगी कार्यालयाजवळून जात असताना दोन संशयितांनी त्यांना अडवून सीआयडी पोलीस असल्याची बतावणी केली़ तसेच तुमच्या घरी खून झाला असून, अंगावरील दागिने काढून द्या, असे दरडावून सांगितले़ पोलीस असल्याच्या बतावणीवर विश्वास ठेवून जाधव यांनी पन्नास हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, वीस हजार रुपये किमतीची गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत असे एकूण ७० हजारांचे दागिने काढून दिल्यानंतर संशयितांनी पळ काढला़
जाधव यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित गंगापूर पोलीस ठाणे गाठून या दोन्ही भामट्यांविरोधात फिर्याद दिली़

Web Title: Woman fraud