आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

By Admin | Updated: March 19, 2017 00:27 IST2017-03-19T00:26:19+5:302017-03-19T00:27:53+5:30

सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ आहे़

The woman died on the spot | आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

आयशरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

 सिडको : गतिरोधकावर आयशर वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे दुचाकीवरील वृद्ध महिला आयशरखाली पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उत्तमनगर अभिनव शाळेच्या प्रवेशद्वारासमोर घडली़ मयत महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे (सिडको) असे आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ट्रकचालक आप्पा मोतीराम बच्छाव (५३, रा़ राणाप्रताप चौक, सिडको) विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हेमंत जयप्रकाश भांबेरे (४०) व त्यांची आई शोभा या दुचाकीवरून (एमएच १५, बीटी ६४७७) घरी जात होते़ उत्तमनगरमधील अभिनव शाळेच्य प्रवेशद्वारासमोरील गतिरोधकावरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आयशरने (एमएच ०४, सीजी ३०६६) दुचाकीला धक्का दिला़ यामध्ये शोभा भांबेरे खाली पडल्या व आयशरच्या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला़
या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला़ या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, नगरसेविका रत्नमाला राणे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरिकांची समजूत घातली़यावेळी नागरिकांनी गतिरोधकावर पांढरे पट्टे तसेच उंचीबाबत तक्रार करून लेखानगर परिसरातही अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले़

Web Title: The woman died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.