गंगापूररोडवर महिलेची पोत खेचली
By Admin | Updated: July 27, 2014 01:51 IST2014-07-27T01:05:30+5:302014-07-27T01:51:28+5:30
गंगापूररोडवर महिलेची पोत खेचली

गंगापूररोडवर महिलेची पोत खेचली
नाशिक : प्रसाद सर्कलकडे पायी जाणाऱ्या महिलेची सोन्याची पोत खेचल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील प्रसाद सर्कलजवळच्या गंगोत्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जयश्री दुर्वास कोठावदे या गुरुवारी रात्री मुलासमवेत शतपावली करीत होत्या़ विद्याविकास सर्कलकडून प्रसाद सर्कलकडे पायी येत असताना यामाहा मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी कोठावदे यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेली़