शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अशोकामार्गावर महिलेची पोत खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 18:13 IST

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़

ठळक मुद्दे७० हजार रुपयांची सोन्याची पोत

नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सद््गुरू अपार्टमेंटमधील रहिवासी छाया प्रकाश कोतले या रात्री आठ वाजेच्या सुमारास अशोकामार्गाकडे कॉलनीरोडने पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले व फरार झाला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहस्थनगरला घरफोडीनाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ व १६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी सिंहस्थनगरमधील रहिवासी अक्षय खैरनार यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील कपाटातून २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, सात हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे ओम पान व दहा हजार रुपयांची रोकड असा ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोबाइलची चोरीनाशिक : पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश नागपुरे हे हवामान खात्याच्या कार्यालयातील कर्मचारी असून, रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाच्या टेरेसच्या दरवाजातून प्रवेश करून टेबलवर ठेवलेला महागडा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस