आयसीएमएआय फाउंडेशन परीक्षेत साक्षी शेळके प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:39+5:302021-09-24T04:16:39+5:30
नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटस् ऑफ इंडियातर्फे ( आयसीएमएआय) देशभरात घेण्यात आलेल्या सीएमए फाउंडेशन जून २०२१ ...

आयसीएमएआय फाउंडेशन परीक्षेत साक्षी शेळके प्रथम
नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटस् ऑफ इंडियातर्फे ( आयसीएमएआय) देशभरात घेण्यात आलेल्या सीएमए फाउंडेशन जून २०२१ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिक शाखेतून साक्षी शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे नाशिक शाखेच्या अन्य ८३ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे.
सीएमए फाउंडेशन परीक्षेत नाशिक विभागातून एकूण १०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात साक्षी शेळके हिने ४०० पैकी ३४२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर धनश्री केदार हिने ३४० गुणांसह द्वितीय व आदित्य तुंगार याने ३२६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर यश संपादन केले आहे. कॉस्ट अकाउंटंटस् परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे नियोजन केंद्र सरकारच्या ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस् ऑफ इंडिया (आयसीएमएआय) या संस्थेकडून करण्यात येत असून, बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे इंटरमीडिएट परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
230921\23nsk_29_23092021_13.jpg~230921\23nsk_30_23092021_13.jpg~230921\23nsk_31_23092021_13.jpg
तिनही फोटो आरफोटोला सेव्ह आहे. ~तिनही फोटो आरफोटोला सेव्ह आहे. ~तिनही फोटो आरफोटोला सेव्ह आहे.