शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

याद्यांच्या पडताळणीशिवाय नाशिक जिल्ह्यातील  शेतक-यांच्या खात्यावर पैसे नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 3:02 PM

सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : फक्त एक टक्केच काम अद्याप पुर्ण

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील शेतक-यांनी आॅनलाईन भरलेल्या माहितीची संपुर्ण पडताळणी झाल्याशिवाय एकाही शेतक-याच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ८७९ शेतक-यांच्या कर्जमाफी अर्जांची आजपावेतो पडताळणी झाली असल्याने अजुन ९९ टक्के काम अपुर्ण असल्याने शेतक-यांना नोव्हेंबर अखेर कर्जमाफी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.कर्जबाजारी शेतक-यांचे कर्जमाफ करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने जून महिन्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून त्यासाठी तीन टप्पे जाहीर केले होते. दिड लाख रूपयांपर्यंतचे संपुर्ण कर्ज माफ करण्याबरोबरच त्यापुढील कर्जदार शेतक-याने उर्वरित कर्जाचा भरणा केल्यास त्यालाही या दिड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा व ज्यांनी संपुर्ण कर्जफेड केली त्यांना २५ हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी शेतक-यांनी आॅनलाईन कर्जमाफीचा अर्ज सादर करण्याची तरतूद केली होती. नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक लाख ८० हजार शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले असून, त्यांनी कर्ज घेतलेल्या जिल्हा व राष्टÑीयकृत बॅँकांनी देखील आपल्याकडील शेतकरी कर्जाची माहिती शासनाकडे सादर केली होती. शेतक-यांनी सादर केलेली आॅनलाईन माहिती व बॅँकांची माहिती या दोघांची पडताळणी करणारे सॉफ्टवेअर शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केले असून, त्याच्या आधारे जिल्ह्यातील फक्त ८७९ शेतक-यांच्या माहितीची आजपावेतो पडताळणी केली आहे. एकूण शेतक-यांच्या अर्जांचा विचार करता हे प्रमाण फक्त एक टक्के इतके आहे. ज्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली, त्यांच्या कर्जाचे पैसे जिल्हा बॅँकेला प्राप्त झालेले असले तरी, कर्जदार शेतक-यांच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरीय समित्यांकडून अहवाल आल्याशिवाय शेतक-यांच्या खात्यावर पैसे टाकणे शाासनाच्या नियमांमुळे शक्य नाही.सध्या राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान खात्याच्या कारभार अतिशय संथपणे सुरू असून, त्यावर शासनाने वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आहे, दुसरीकडे शासनाने नोव्हेंबर अखेर सर्व शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे आश्वासनही दिले आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबर अखेर हे काम होणे शक्य नसून, सहकार खात्याच्या अधिका-यांच्या मते अजुन किमान २० दिवसांचा कालावधी त्यासाठी लागू शकतो.

टॅग्स :agricultureशेतीbankबँक