जागा ताब्यात नसताना रस्त्याचे भूमिपूजन
By Admin | Updated: October 30, 2015 23:35 IST2015-10-30T23:34:50+5:302015-10-30T23:35:51+5:30
भगूर न.पा.विरुद्ध तक्रार : आत्मदहनाचा इशारा

जागा ताब्यात नसताना रस्त्याचे भूमिपूजन
नाशिक : रस्त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली, परंतु नगरपालिकेने भूसंपादन न केलेल्या जमिनीवर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्याचा घाट भगूर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी घातला असून, तसे केल्यास नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा जागामालक व सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी दिला आहे.
या संदर्भात करंजकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भगूर येथे सर्व्हे नंबर १३० ही जागा माझ्या कुटुंबीयांच्या मालकीची असून, त्यावर नगरपालिकेने रस्त्याचे आरक्षण टाकून भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविला आहे.
सदरची जागा भूसंपादन करायची असल्यास नुकसान भरपाईची ५० टक्के रक्कम नगरपालिकेने अगोदर भूसंपादन अधिकाऱ्याकडे भरायला हवी, परंतु सन २०१३ पासून वेळोवेळी नगरपालिकेला कळवूनही त्यांनी पैसे भरले नाहीत, परिणामी जागेचे भूसंपादन होऊ शकलेले नाही.