व्यायाम साहित्य वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून

By Admin | Updated: August 8, 2014 01:34 IST2014-08-08T00:33:13+5:302014-08-08T01:34:40+5:30

क्रीडा व व्यायाम प्रकाराचे साहित्य प्रत्यक्षात वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून

Without distributing exercise materials, the gram panchayat falls | व्यायाम साहित्य वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून

व्यायाम साहित्य वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून



नाशिक : शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे क्रीडानैपुण्य वाढविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींना पुरविलेले क्रीडा व व्यायाम प्रकाराचे साहित्य प्रत्यक्षात वाटप न करताच ग्रामपंचायतींकडे पडून असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली.
शिक्षण समितीची बैठक सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत झाली. दरम्यान, साहित्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्णातील २७० ग्रामपंचायतींच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. या वर्षाकरिता व्यायाम साहित्यासाठीची दोन लाखांची रक्कम वाढवून सात लाख करण्यात आली असून, लवकरच या रकमेतून संबंधित ग्रामपंचायतींना व्यायाम व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोचरगाव येथील प्राथमिक शाळेत ७२५ विद्यार्थिसंख्या असल्याने दोन सत्रांत शाळांचे वर्ग चालविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.
येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांची चुकीची संख्या कळविल्याने येवल्याला दोन हजार पुस्तकांचा संच कमी आला. त्यामुळेच चुकीची माहिती पाठविणाऱ्या गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सदस्य प्रवीण गायकवाड यांनी केली. तसेच शिक्षण हक्क कायद्यानुसार पाचवीचे ५३० व आठवीचे १६७ वर्ग सुरू झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.
जिल्ह्णातील ४३७ शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या २० च्या आत आहे. अशा शाळांमध्ये ८०५ शिक्षक कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यातील ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या आत असेल अशा शाळा बंद करून त्या शाळांतील विद्यार्थी एक किलोमीटर परिसराच्या आतील शाळांमध्ये वर्ग करण्यात यावेत, असा ठरावही प्रवीण गायकवाड यांनी मांडला. त्यास उषा बच्छाव यांनी अनुमोदन दिले. येवला येथे सात विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण झाली.
त्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होतो की नाही याची तत्काळ तपासणी करून अहवाल पाठविण्यात यावा. ज्या शाळा अहवाल पाठविणार नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला. बैठकीस प्रा. अशोक जाधव, माधुरी बोरसे, कल्पना सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी रहीम मोेगल आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Without distributing exercise materials, the gram panchayat falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.